Sagevaani.com /जालना: एक ट्रक चालला होता, त्याच्या पाठीमागे लिहीले होते, बुरी नजरवाले तेरा मुंह काला, तर दुसर्या ट्रकच्या पाठीमागे लिहिले होते, बोलो मगर प्यार से…. प्यार बोले तो कलह होने का कामही नही! परंतू आज काल आम्ही कलह करण्यात फार गुरफटून गेलो आहोत. भांडण होण्याला काही तरी ठोस कारण हवे, परंतू भांडण होण्यालाही कारण लागत नाही, असा हितोपदेश साध्वी प. प. सत्यसाधनाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या.
यावेळी पुढे बोलतांना साध्वी प. प. सत्यसाधनाजी म. सा. म्हणाल्या की, कलह म्हणजे भांडण! भांडणं होण्याला काहीही कारण लागत नाही, ते कशावरुनही लागू शकते. एक ट्रक चालला होता, त्याच्या पाठीमागे लिहीले होते, बुरी नजरवाले तेरा मुंह काला, तर दुसर्या ट्रकच्या पाठीमागे लिहिले होते, बोलो मगर प्यार से….
प्यार बोले तो कलह होने का कामही नही! परंतू आज काल आम्ही कलह करण्यात फार गुरफटून गेलो आहोत. भांडण होण्याला काही तरी ठोस कारण हवे, परंतू भांडण होण्यालाही कारण लागत नाही, जब भी बोले प्यार से बोले! तो कलह होने की बातही नही आती! ज्ञानी भगवंतही सांगतात की, बोलो मगर प्यार से… परंतू ऐकणार कोण! हा खरा प्रश्न आहे.दोन भाऊ खूप प्रेमाने राहत होते. परंतू लोकांना ते पाहवेल का? नाही ना!
असे सांगून त्यांनी कलहाबद्दल विविध उदाहरणाव्दारे इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन करुन सर्वांचे आभार मानले.