जालना : प. पू.हिमानीजी म. सा. यांचा वाढदिवस आज तपोधाममध्ये हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. प.पू. हिमानीजी म. सा. यांचे आज रोजी आयबीलचे 108 वा उपवास असून त्याच पार्श्वभूमीवर आज वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच धुळे येथील संगीता बाफना यांचेही 81 आहेत. त्यांची आज संघात पचकावनी होती.
जीनवाणी अजूनही फायदा नाही तर ती आपल्या जीभेवर असायला हवी. तरच त्याचा काही उपयोग होईल, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधनेच्या अध्यायातील प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती. प्रवचनाच्या प्रारंभीच त्यांनी आजच्या दिवसाचे महत्व सांगून ते म्हणाले की, प. पू. हिमानीजी म. सा. यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, जीनवाणी आणि आगम फार काही वेगळे नाहीत. परंतू जीनवाणी सतत आपल्या जीभेवर असायला हवी. आपली पुण्यवाणी त्यामुळेंच कामा येईल. जेव्हा आपण चांदी- सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येण्यापेक्षा आपण जीनवाणीत जन्मलो आहोत, याचा आपल्याला गर्व असायला हवा. परंतू आपल्या का भटकावे लागत आहे.
ज्याला जीनवाणी आठवणीत आहे, त्याला आगम सुध्दा लक्षात असायला हवेत, असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.