जालना: प्रभू महावीरांनी अखंडपणे देसना का केली. तर आपण का करु शकत नाहीत, आपणही प्रभूंसारखी देसना केली पाहिजे,असा हितोपदेश संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. तत्पूर्वी प. पू. साध्वी हर्षप्रज्ञाजींनी याच विषयावर मार्गदर्शन केले.
संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. म्हणाल्या की, हमारी आत्मा समक्य दृष्टी जरुर कर सकती है! क्यों ना हम करे। प्रभू महावीरांनी प्रथम चातुर्मास केला. आणि त्यांचा शेवटचा चातुर्मास होता तो देखील कुठे केला. हे आपणासर्वांना अवगत आहे. परंतू सांगायचं तात्पर्य हेच की ते जे करतात आपण का करु शकत नाहीत. आपण सुद्दा करु शकतो. परंतू ती इच्छा शक्ती आपल्यात नसते म्हणून त्यांच्यासारखं कार्य आपणाकडून होत नाही,आपण ते करु शकत नाहीत.
प्रभूंचा भर हा प्रारंभापासूनच उतराखंडावर राहिला आहे. पंढरपूरच्या दिशेने लाखो लोकं जातात. तेथे भगवतांचं दर्शन घेऊ शकत नाहीत. मग कशाचं दर्शन घेतात तर ते कळसाचं. आपल्या समाजातील उत्तराखंड सुध्दा कळस आहे. त्याचं दर्शन आपण घेतले पाहिजे, असे सांगून त्यांनी प्रभू महावीराबद्दल विविध उदाहरणाव्दारे इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.