पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने निगडी येथील पर्ल बॅंकेट सभागृहात इ 10 वी व 12वी मधील विशेष प्राविण्य मिळविलेल्या 110 विद्यार्थ्यांचा सन्मान सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला , यावेळी जिल्हा संचेती हॉस्पिटल चे प्रमुख संचालक डॉ पराग संचेती आणि अहिल्या नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद जी भंडारी ( IAS )हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया हे अध्यक्ष स्थानी होते. विद्यार्थी गुणगौरव मुख्य अतिथी आणि महासंघाचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी बोलताना अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद जी भंडारी (भा.प्र.से) यांनी प्रतिपादन केले की प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्याची गरज आहे वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे आणि विविध वर्तमानपत्र पुस्तक वाचून आपल्या ज्ञानामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे स्पर्धा परीक्षांना निश्चितपणे वाचनाची आवश्यकता असते सामान्य ज्ञान आणि विविध विषयांच्या ज्ञानासाठी पुस्तकवाचन आवश्यक असते विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर संस्कार जतन करण्याची आजच्या काळात विशेष आवश्यकता आहे आपल्या आई-वडिलांचे आशीर्वाद साधू संतांची कृपा याचेही.
जीवनामध्ये अतिशय महत्त्व असते आणि म्हणून त्यांची सेवा करण्यास विसरू नका कोणत्याही शाखेमध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही परंतु केवळ विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष न देता स्वतःचे आरोग्य खेळ व विविध आवडीनिवडी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे ,श्री भंडारी यांनी स्पर्धा परीक्षा साठी अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले असे सांगितले डॉ पराग संचेती यांनी यशाची गुरुकिल्ली ही सकारात्मक विचार, आवडीनुसार योग्य अभ्यासक्रमाची निवड ह्यामध्ये असते असे प्रतिपादन केले, त्यांनी मेडिकलच्या विविध अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. जैन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांनी ही वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमाविषयी थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महासंघाचे मंत्री विरेश छाजेड यांनी स्वागत केले , महामंत्री संदीप फुलफगर यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला आणि महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
सूत्रसंचालन प्रा सचीन पवार यांनी केले ,यावेळी महासंघाचे स्वागताध्यक्ष किरणभाई शाह ,माजी अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमुथा, विलासकुमार पगारिया, प्रा प्रकाश कटारिया, सूर्यकांत मुथियान,उमेश पाटील, कोषाध्यक्ष नेनसुखजी मांडोत, कार्याध्यक्ष विजय भिलवडे तसेच प्रकाश गदिया , अशोक बागमार , अशोक लुंकड, दिलीप भन्साळी, सुभाष ललवाणी, हे संघ अध्यक्ष आणि अशोक नहार , सुनील कोठारी , संतोष गुगळे, डॉ स्मिता भंडारी,अनिता नहार हे मान्यवर उपस्थित होते , कार्यक्रमाच्या संयोजन, नियोजनासाठी, महासंघाचे सह कोषाध्यक्ष तुषार मुथा , उपाध्यक्ष श्रेणिक मंडलेचा, तसेच सचीन कोगनाळे, संदेश गदिया ,शुभम कटारिया ,हर्षल लुंकड ह्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.