श्रीरामपूर दि. 29 (वार्ताहर) : ज्या ठिकाणी दोन मने जुळतात ते घर महालापेक्षा सुंदर असते, एकमेकातील नाते जपली तरच घराचे घरपण टिकु शकेल असे विचार जैन स्थानकामधील चातुर्मासार्थ सुरु असलेल्या घर या विषयावर बोलतांना प्रज्ञाज्योती पू. श्री. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी व्यक्त केले.
नाते कसे असावे याबद्दल बोलतांना त्या म्हणाल्या की, नाते डोळे आणि हात यांच्यासारखे असावेत, डोळ्यात पाणी आले तर आपण हाताने पुसतो, पायात काटा गेल्यास डोळ्यांत पाणी येते, डोळे आणि हात यांचे अतुट नाते असते, जेथे प्रेम तेथे संपत्ती असते, एकमेकाबद्दल क्लेश, राग, द्वेष नसावा, क्लेष असणे हे बाराचे भाव आहे, त्या घरात कलह असतात त्या घराचे नेहमीच बारा वाजतात. एकता नावाच्या महिलेने ज्या घरी टी.व्ही. मालिका बनविल्या त्या मालिकांत घर भक्कम राखण्याएैवजी घर फोडणार्या होत्या, लग्नानंतर मालिका लग्नाआधिच संपली.
आवडणारा क्षण परत परत येत नाही, नको असलेले क्षण पुन्हा येतात ते विसरले पाहिजे, जो पर्यंत झाडु एकसंघ आहे तो पर्यंत कचरा साफ करता येतो, झाडु मोकळा झाला की कचरा साफ होत नाही. चाल चुकली तर ताल चुकते, संकटात घरण्याची आठवण येते, घराला प्रेमाचे धाग्यात गुंफवायचे आहे, नेहमी छत्ताीस आकडा बनावे त्रेसष्ठाचा नको.
जे मिळते त्यातच समाधान मानले पाहिले ज्या घरात फुट असते त्या घरात लुट होणारच. आपल्या घरातील सदस्याचे मतभेद असु द्यावेत पण मतभेद नकोत, सर्व सदस्यांनी एकजुटीने बांधुन ठेवले तरच ते घर भक्कम राहील तचे घर आदर्श असते असे पू. श्री. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी प्रवचनातुन स्पष्ट केले.
यावेळी विद्याभिलाषी पू. श्री. तिलकदर्शनाजी म.सा. यांनी प्रवचनातुन तारुण्यात धर्म आराधना करुन पुण्य प्राप्त करा, पुण्याने मोक्ष प्राप्त होईल, लहान बालकांवर बालपणी धर्म संस्कार घडवावेत ते आयुष्यात सुसंस्कृत होतात व प्रगती होते असे स्पष्ट केले.