श्रीरामपूर दि.21 (रमेश कोठारी) धर्म व कर्म अडीच अक्षरे आहेत.धर्म मोक्षाकडे नेतो तर कर्म नरकाची वाट दाखवतात.असे प्रतिपादन प्रज्ञाज्योती प्रखर व्याख्यात्या पू.श्री.विश्वदर्शनाजी म.सा यांनी केले. पू.विश्वदर्शनाजी प्रवचनात म्हणाल्या की,मनावर संयम कसा ठेवायचा धर्माचारणाकडे कसे वळावयाचे हे धर्म शिकवतो पण अशुद्ध कर्मामुळे नरकाच्या मार्गावर वाटचाल करावी लागते.धर्माने वागणाय्राला नेहमीच फळ चांगले मिळते.हे विसरु नका.कर्मामुळे सुख दुःख प्राप्त होते.म्हणून धर्माचारण करणे चांगले आहे.
आज आपण नाती विसरत चाललो हे दुर्दैव आहे.आपल्याला जीवनरुपी कोरा कागद मिळाला आहे त्यावर चांगल्या विचारांचे पत्र लिहावे.त्यामुळे आनंदच मिळेल.चांगले कर्म चांगले फळ हे ठरलेलेच आहे.एकमेकांशी नाती टिकवली पाहीजेत.पुर्विच्या काळी पत्रव्यवहार लिहीण्याची पध्दत होती.पत्राव्दारे आपण आपल्या भावना, व्यथा,सुख दुःखाच्या गोष्टी दुसय्राला कळवत होतो. दुसय्राकडून आपल्याला खुशाली कळत असते.पत्र हे एकमेकांना जोडणारा दुवा होतं.आजकाल पत्राऐवजी मोबाईल ॲपव्दारे मेसेज पाठवतात.त्यामध्ये कृत्रिम पणा जाणवतो .
पुर्विचे लोक भावनिक होते.आजकालचे लोक प्रॅक्टीकल बनले पुर्वी पत्राद्वारे नाते टिकवत होतो पण आता नाते विसरत चाललो आहोत.माणसाला आयुष्यभर जीवनाच्या कागदावर चांगले वाईट लिहीण्याची संधी मिळते.त्या पत्रात दुसऱ्याकडून प्रतिउत्तर मिळते.आज सर्वत्र व्यवहार बनला आहे.या व्यवहारात भावना नाही फक्त पैशाचाच विचार होतो.असे पू.श्री.विश्वदर्शनाजी म.सा यांनी प्रवचनातून मार्गदर्शन करताना नमुद केले.
पू.श्री.तिलकदर्शनाजी म.सा प्रवचनातून म्हणाल्या,गुरुपुढे आपण आपले ह्रद्य खुले केले पाहिजे.तरच गुरुची कृपा होते.अवगुण दुर्गुण बाजुला सारुन कर्म आराधना करावी.कबरीवरील फुले सुंदर दिसतात.पण आत मुडदा असतो.हे आपण विसरतो गुरुच्या आशिर्वादाने दिशा मिळते.तप साधनेत मोठी ताकद आहे.