श्रीरामपूर दि. 18 (रमेश कोठारी) धर्मग्रंथाचा अभ्यास जीवनाला मार्गदर्शक असतो सर्व समस्या सोडविण्याचे उपाय धर्मग्रंथात असतात. धर्मग्रंथ आपल्याला वेळोवेळी सावधान करतात व समाधानही देतात. असे विचार श्रीरामपूरच्या जैन स्थानकामध्ये प्रखर व्याख्यात्या प.पु विश्वदर्शनाजी महाराज यांनी व्यक्त केले.
मनुष्य जन्माचा प्रवास करताना अनेक अडचणी व धोके येतात त्या सोडवण्याची दिशा धर्मग्रंथातून मिळते असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या कि, संतांचे प्रवचनातून परामात्म्याचे स्वरूप कळते. सुखकर जीवन प्रवासासाठी धर्मग्रंथ नेहमीच उपकारक ठरतात . प्रवचन ऐकून त्यातील विचार आचरणात आणावेत तरच त्या प्रवचन श्रवणाचा उपयोग होईल.डॉक्टर ,वकील,इंजिनियर यांच्यावर विश्वास ठेवतो पण परमात्म्यावर विश्वास ठेवताना मनात धाकधूक होते. परमात्म्यावर विश्वास ठेवा . तो सर्व काही ठीक करतो.
धर्मग्रंथांची वचणे कधीही बदलत नाहीत त्यात ताकद असते.त्या वचनाबद्दल संशय घेऊ नका . त्या वचनानुसार आचरण केले तर चांगले अनुभव येतील. धर्मग्रंथ आपल्याला सावधानतेचा इशारा देतात. पण आपण तिकडे लक्ष देत नाही. त्यामुळेच दुःखाचा सामना करावा लागतो .उच्च वाढली कि अपेक्षाही वाढतात त्या पूर्ततेसाठी प्रत्येकजण धडपडत असतो त्या पूर्ण नाही झाल्या तर माणूस क्रोधीत होतो. व त्याचे घडते.संसाराचा पसारा वाढवू नका संसारातुम कधी निवृत्त व्हायला पाहिजे हे कळले पाहिजे.
प.पु तिलकदर्शनाजी म .सा यांनी प्रवचनातुंन नमूद केले कि धर्मस्थानामध्ये येताना लहान मुलाप्रमाणे असावे ,वाचिक,शारीरिक,मानसिक हिंसेपासून दूर राहावे. धर्माबद्दल आकर्षण निर्माण झाले कि ,संसार त्यागाची भावना निर्माण होते.