Sagevaani.com /जालना: माणसाने दुखात आणि सुखातही प्रभूंचे नामस्मरण करायला हवे. केवळ सुख आले नाही तर दु:खात सुध्दा प्रभूला विसरुण जाऊ नये, असा हितोपदेश साध्वी प.पू. सौम्यज्योतिजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती.
साध्वी प.पू. सौम्यज्योतिजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाल्या की, अनंत सुखाची प्राप्ती तर सर्वांनाच हवी असते. परंतू प्ररंतू प्रभू सांगतात त्याप्रमाणे आपले आचारण असायला हवे. दु:ख आले म्हणून आले म्हणून काय झाले. परंतू दु:खातही प्रभूंना विसरु नये, आणि सुखातही विसरु नये, साध्वी प.पू. सौम्यज्योतिजी म. सा. असेही त्या म्हणाल्या. त्यानंतर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांचे प्रवचन झाले. त्या म्हणाल्या की, दोन जावा-जावा होत्या.त्यांच्या इतके प्रेम होते, पाहयची सोय नाही. परंतू मोठ्या जावाचा वाढदिवस येतो आणि लहान्या जावाला माहेराला जायचे असते. ती जर यावेळी गेली नाही तर पुन्हा कधी जाणे होईल, याची कोणतीही गॅरंटी नसते.
मी मोबाईलवर त्यांना शुभेच्छा देते, असे म्हणून ती माहेराला निघून जाते. इकडे वाढदिवसाची संपूर्ण तयारी होते. मोठ्या जावाला अनेक फोन येतात. परंतू ती ज्या फोनची वाट पाहत असते. तो काही फोन येत नाही.संध्याकाळ व्हायला येते, रात्रीचे बारा वाजता तरीही फोन नाही! मोठी जाऊ प्रचंड नाराज होते. ती माहेराहून आल्यानंतर मोठ्याच्या पाया पडण्याची प्रथा असते. लहानी जाऊ जेव्हा पाया पडते, तेव्हा ती झटक्याने नाक मुरडते. ही विचार करु लागते की, थोरल्या जाऊ बाईना काय झाले. त्यांच्यात इतका वाईटपणा येतो की, लहान- मुलांना सुध्दा त्या इकमेंच्या विरोधात उभे करतात. परंतू थोरली जाऊ असा विचार करत नाही की, लहान जाऊ नुकतीच माहेरी गेली आहे.
तिच्या गप्पा- गोष्टी सुरु असतील. किंवा फोन करायची ती विसरुन गेली असेल, म्हणून तिने फोन केला नसेल. प्रभू सांगतात की, तीन गोष्टी कधीही लक्षात ठेवल्या पाहिजेत, 1) दिल बडा कर दो! 2) दिल थंडा रखो! और तिसरी बात जबान मिठी रखो! ये तीन अनमोल बाते है! असेहीत्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले.