जालना : रावण तसा काहीही वाईट नव्हता, त्याच्याकडून फक्त एक अपराध झाला होता. तो अपराधच त्याला बदनामीत रुपांतरीत झाला. आणि त्याला जन्मभर डाग लागला. त्यामुळेच आपण रावणाचा व्देष करु लागलो परंतू त्याला दहा तोंडे असतात, हे कुणी पाहिले? त्याला हे तोंड केव्हापासून आले, याची सुध्दा एक आख्यीका आहे, असे प्रतिपादन साध्वी प.पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी येथे बोलतांना केले.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या.
तत्पूर्वी साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी कालच्या प्रचवनाचा थोडक्यात आढावा घेऊन त्या म्हणाल्या की, आचार्य हे पद मोठे असले तरी त्यानंतर उपाध्याय पद सुध्दा आले. हे पद मुख्यमंत्र्यांप्रमाणे आहे, असे सांगून त्यांनी श्रीपाळ आणि नैनासुंदरीची प्रवचनातून इंत्यभूत माहिती दिली. त्यानंतर संधारा प्रवर्तिका साध्वी प. पू.सत्यसाधनाजी यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, रावणाला दहा तोंडे होती, हे कुणी पाहिले?
तुमच्यापैकी कुणी पाहिले का? नाही ना! त्यांच्या दहा तोंडाची एक कहाणी आहे. ती बहुतेक करुन आपल्याला माहित नसेल. रावण हा लहान होता. एकवेळ खेळता खेळता तो आलमारीजवळ आला. तेव्हा आलमारी उघडी होती. ती काही मुद्दामहून उघडी ठेवली नव्हती. परंतू राहिली! तिच्यात एक रत्नजडीत हार होता.
तो रावणाने गळ्यात घातला. तेव्हापासून त्याला दहा तोंडे आली. नऊ रत्न म्हणजे नऊ तोंडे आणि एक आहे ते तोंड असे मिळून दहा तोंडे त्यास आली, असे सांगून साध्वी सत्यसाधनाजी म्हणाल्या, ावण तसा काहीही वाईट नव्हता, त्याच्याकडून फक्त एक अपराध झाला होता. तो अपराधच त्याला बदनामीत रुपांतरीत झाला. आणि त्याला जन्मभर डाग लागला. त्यामुळेच आपण रावणाचा व्देष करु लागलो. मात्र केवळ सितेचे हारण केल्यामुळे मरणानंतरही तो बदनाम झाला आहे. नाही तर रावणाला जाळण्याची हिंमत कोणाची आहे? आज तर जिथे- तिथे रावण आहेत, असे त्यांनी शेवटी सांगितले. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.