Sagevaani.com /जालना: आपल्या आत्म्याचं कल्याण करायचं असेल तर प्रभूंची आराधना ही प्रत्येकाने केलीच पाहिजे,त्याशिवाय आपल्याला आत्म्याचं कल्यण करता येणार नाही,असा हितोपदेश साध्वी प.पू.गुरुछायाजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला. तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती. आजही संघामध्ये साध्वी प. पू. अर्हतज्योतीजी म. सा. यांनी विविध प्रकारचा जाप केला.
प्रवचनाच्या प्रारंभीच साध्वी सौम्यज्योतिजी म. सा. यांनी आपल्या सुंदर आवाजात ढुंगे कहॉ ऽऽऽ हे गीत गायिले. याच गितावर आधारीत साध्वी प.पू.गुरुछायाजी म.सा. पुढे बोलतांना म्हणाल्या की, ुपरमेश्वराला आपण खर्याअर्थाने ओळखलेच नाही. तो आपल्या जवळ असूनही आपण त्याला इकडे – तिकडे पाहात आहोत. आत्मा हाच खर्याअ्रर्थाने परमात्मा आहे. परंतू त्या ओळखण्याचे सामर्थ्य आमच्यात नाही. ते का नाही, याचेही कारण आहे.
कारण आम्ही प्रभूंची आराधना करायला विसरलो आहोत. तो आपल्या जवळ असूनही आपण त्याला लांब हुडकू लागलो आहोत. ही बाब गंभीर आहे, असे सांगून साध्वी प.पू.गुरुछायाजी म.सा. यांनी आपल्या प्रवचनातून विविध उदारणे दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.