Sagevaani.com /जालना: नको ते करायचे आणि हवे ते सोडून द्यायचे हा मानवाचा स्वभाव असल्यामुळेच आपण परमात्मा बनत नाहीत, परंतू हव्या त्या मार्गाने गेल्यास आपणही परमात्मा बनू शकतो, असा हितोपदेश साध्वी प.पू.गुरुछायाजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती. आजही संघामध्ये साध्वी प. पू. अर्हतज्योतीजी म. सा. यांनी विविध प्रकारचा जाप केला.
पुढे बोलतांना साध्वी प.पू.गुरुछायाजी म.सा. म्हणाल्या की, आपण परमात्मा का बनू शकत नाहीत. कारण जे करायला हवे ते आपण सोडून देतो, आणि करायला नको ते आपण करतो म्हणून परमात्मा बनत नाहीत. परंतू आपणही परमात्मा बनू शकतो याची खात्री आणि विश्वास असायला हवा. परमात्मा बनण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते आपण करायला हवे, परंतू मनुष्य नको ते स्वीकारतो आणि हवे ते सोडून देतो, म्हणून आपण परमात्मा बनू शकत नाहीत. परंतू प्रभूंना जे जे हवे ते ते आपण करु लागलो किंवा केले तर निश्चितच आपण सुध्दा परमात्मा बनू शकतो. दिन हो या रात फीर भी हम कहते, हम सब एक हैे। आपण तर जैन बनलात आहात. परंतू परमात्मा? कब बनोगें ! आपणही परमात्मा बनू शकतो, परंतू आपल्याला परमात्मा बनण्यासाठी जे आवश्यक आहे ते करावे लागेल. काय करावे लागेेल तर प्रभूंची वाणी, जीनवाणीकडे आपल्याला वळावे लागेल.
त्याशिवाय परमात्मा बनने शक्य नाही,असे सांगून साध्वी प.पू.गुरुछायाजी म.सा. यांनी आपल्या प्रवचनातून विविध उदारणे दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी सुत्रसंचालन करुन उपस्थित सर्वांचे आभार मानले.