Sagevaani.com /जालना : चिंतन करा परंतू ते प्रभूंचे हवे! प्रभूंचे चिंतन कधीही व्यर्थ जात नाही. म्हणूनच आगमची वाणी ऐकली पाहिजे, या वाणित खूप ताकद आहे, त्याशिवाय आपली आत्मा मोक्षाला कशी जाईल,असा हितोपदेश साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती.
नैनासुंदरी या गितावर आधारीत पुढे बोलतांना साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, आगमची वाणी ही नेहमीच वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे. मग आपण संसारात राहा किंवा दुसरीकडे कुठेही असूद्यात, चिंतन करा परंतू ते प्रभूंचे हवे! प्रभूंचे चिंतन कधीही व्यर्थ जात नाही.
म्हणूनच आगमची वाणी ऐकली पाहिजे, या वाणित खूप ताकद आहे, त्याशिवाय आपली आत्मा मोक्षाला कशी जाईल, असे सांगून त्या म्हणाल्या की, श्रीपाळ तर जीवंत होता, तरीपण त्याला दृष्टीपथात येण्यासाठी काही अवधी होता. इकडे धवलसेठ त्याच्या दोन पत्नींना आपलेसे करुन घेण्यासाठी व्याकुळ होता. त्याने शेवटी त्या दोघींच्याही दाशीलाही स्वर्णमुद्राची लालच दाखविली परंतू त्यात त्याला यश आले नाही. धवलसेठ ते तिघेही म्हणतात, आम्ही अगोदरच सांगितले होते, तू जे करतोस ते बरोबर नाही. परंतू चौथा खोराडा त्याला म्हणतो, एक प्रयत्नात यश आले नाही म्हणजे हार थोडीच मानायची! अजूनही वेळ गेलेली नाही, असे म्हणून हा चौथा खोरडा त्याला भडकावू संभाषण करतो.
आणि धवलसेठलाही ते खरेच वाटते. धवलसेठ रडत- रडत त्या दोन्ही राणीकडे येतो, जे होणार आहे, त्याला कोण टाळू शकतो. मी तुमचा सांभाळ करील, तुमच्या नावे सारी संपत्ती करेल, असे सांगतो. परंतू त्या दोघीही त्याच्या बोलण्याला मानत नाहीत, आणि आपल्या म्हणण्यावर ठाम राहतात. एकडे श्रीपाळचा उदय होतो. तेव्हा मात्र धवलसेठ घाबरतो आणि त्या दोघी पुढे लोटांगण घालू लागतो. मला माफ करा, मी चुकलो असे म्हणून तो ओरडू लागतो, असे सांगून प. पू. हर्षप्रज्ञाजींनी म. सा. यांनी श्रीपाळबद्दल इंत्यभूत माहिती यावेळी दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन शेवटी सर्वांचे आभार मानले.