ज्येष्ठ उद्योजक श्री जयकुमारजी चोरडीयांचा “ सहस्र- चंद्र” दर्शन सोहळा! निगडी येथील प्रसिध्द उद्योजक तथा आकुर्डी- निगडी- प्राधिकरण श्री संघाचे पुर्व अध्यक्ष श्रीमान जयकुमारजी चोरडीया यांनी आपल्या यशस्वी जीवनाची 80 वर्षे पुर्ण करत आज 81 व्या वर्षात प्रवेश केला.
मुळ नारायणगांव निवासी असुन विधी पदवी ग्रहण करुन 50 वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड उद्योग नगरीत उद्योग व्यवसायासाठी चोरडीया कुटुंबीय चिंचवड येथे आले. बांधकाम व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व वस्तु सॅनिटरी उपयुक्त वस्तुंच भव्य दालन निगडीत उभारुन पिंपरी- चिंचवड सह पुण्यात आपल्या व्यवसायाचा नावलौकिक जयजकुमारजींनी व कालांतराने पुत्र मनोजने प्रस्थापित केला. “ पंचशील” सारख्या उद्योग समुहास शिखरावर नेण्याच काम ज्येष्ठ सुपुत्र स्व. अभयने केले. अशा व्यक्तित्वाच्या जन्म दिवसाचे औचित्य साधत आज आकुर्डी- निगडी- प्राधिकरण श्री संघाचे अध्यक्ष सुभाष जी ललवाणी व पुर्वाध्यक्ष व. प्रसिध्द उद्योजक संतोष जी कर्नावट यांचे शुभहस्ते श्री जयकुमारजींना गौरविण्यात आले व अभिष्ठ चिंतन करण्यात आले.