श्रीरामपूर दि. 03 (वार्ताहर) : घरात नेहमी शांतता व प्रेमाचे वातावरण असेल तरच तेथे लक्ष्मीचा वास टिकुन राहतो, वडीलधार्यांचा आदर करुन एकमेकांची मने जुळणारे घर आदर्श असते असे प्रतिपादन प. पू. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी केले.
आदर्श घराची व्याख्या करतांना त्या म्हणाल्या की, लहानांना प्रेम मोठ्यांना आदर व वृध्दांचा सत्कार घरात करायल हव त्याने घरात शांतता राहील, लक्ष्मी ही चंचल असते, तीला प्रेम व शांतता आवडते, आजकल जमाना बदलला नाही तर वागण्याची पध्दत बदलली आहे, एकमेकांविषयी प्रेम राहिलं नाही, मोठ्यांच्या प्रत्येक शब्दांचा आदर करावा त्यांचे मार्गदर्शनामुळे घरातील एकता टिकवीली जाते.
एखादी संस्था चालवायची म्हणजे नियम व्यवस्था असते, तसेच नियम घरासाठी नाहीतर धर्मशाळा होईल. घरातील भांडण घरातच मिटवावीत, बाहेर गेली तर दुसरे लोक गैर फायदा घेतात. आपल घर आपणच सजविले पाहिजे, मनात कपटी वृत्ती नको, धर्म स्थानकात ज्ञानाचा खजिना असतो, घराच्या सजावटीपेक्षा मनाची अंतर्गत सजावट करा, नवरात्र ही शक्तीची उपासना करण्याचा मार्ग आहे. प्रेम आदर, आपुलकीने आपल घर सजवायचे असते.
आपल्या घराला कुणी नाव ठेवु नये असेच जगायचे, आपल्या घराला तडा जाऊ नये म्हणुन जागृत रहायचे असे त्यांनी नमुद केले.