Sagevaani.com /जालना: ज्ञान हे कधीच वाया जात नाही. आपली आत्मा ही प्रबळ असली की सर्व प्रश्न आपोआप सुटतात. म्हणून मनुष्याला ज्ञान हे पाहिजेच, असा हितोपदेश साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती.
नमोकार या गितावर आधारीत पुढे बोलतांना साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, तीन लक्ष्मी असतात. चौथी असते ती सरस्वती याने की बुध्दी की देवता! या तिन्ही देवी जाण्यासाठी उत्सुक असतात. तो सेठजी म्हणतो, तू चंचल आहे, तुला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी तू थांबणार नाहीस, असे म्हणून तो सेठजी लक्ष्मीला जायला सांगतो. तेव्हा या तिघींही सरस्वतीला म्हणतात तूही चल, आम्ही तिघी तर चाललो आहोतच तू तरी येथे राहून काय करणार आहेस.
त्यावेळी तो सेठजी सरस्वतीला म्हणतो, तु जायचा हट्ट धरला तर मी काय करणार! या रिकाम्या डोक्याने म्हणजे जेथे बुध्दीच नाही तेथे मी तरी या रिकाम्या डोक्याने काय करणार! असे म्हणून तो सेठजी सरस्वतीला जाऊ देत नाही, अशा प्रकारे त्या तिघीही लक्ष्मी येथेच थांबतात! असे सांगून त्या म्हणाल्या की, इकडे श्रीपाळ यांचे चार लग्ने होतात. त्यांनाी मानलेले वडील धवलसेठ मनोमन म्हणतात, अरे हा तर खाली हात आला होता. माझ्यामुळेच याला सुंदर अशा स्त्रीया मिळाल्या पाहिजेत, त्यासाठी श्रीपाळ नसायला हवा. त्याशिवाय त्या दोघी आपल्या कशा होणार! असा विचार धवलसेठ मनात येतो. त्यावेळी त्यांचे तीन सहकारी जे की, चांगले असतात. परंतू चौथा जो असतो तो खोरडा असतो.
तो धवलसेठला म्हणतो, अगदी बरोबर आहे, तुझ्यामुळेच त्या दोघी श्रीपाळच्या झाल्या आहेत. तुला जर का त्यांना प्राप्त करायचे असेल तर अगोदर श्रीपाळ हा नष्ट झाला पाहिजे आणि श्रीपाळला काहीही माहित नसते. धवलसेठ आणि श्रीपाळ दररोज भेटू लागले. त्यांच्या चांगल्या गप्पा होत. एक दिवस मात्र तो श्रीपाळचा जीव घेतो, परंतू दैवगती ही वेगळीच असते. श्रीपाळ कसा बसा वाचतो, नमोकार आणि श्रीपाळबद्दल इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.