दिपावलीत रांगोळी आणि मंदिर व होली आदी जसे महत्वपूर्ण आहेत, अगदी तशाच प्रकारे जैन धर्मात सुध्दा नवपद खूप महत्वाचे मानले आहे. आपल्यासुध्दा श्रीपाळ सारखं आयुष्य मिळावं, असा हितोपदेश साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती.
पुढे बोलतांना साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, दिपावलीत रांगोळी आणि मंदिर व होली आदी जसे महत्वपूर्ण आहेत, अगदी तशाच प्रकारे जैन धर्मात सुध्दा नवपद खूप महत्वाचे मानले आहे, असे सांगून त्यांनी आपला मोर्चा श्रीपाळच्या कहाणीकडे वळवला. त्या म्हणाल्या की, आपल्यासुध्दा श्रीपाळ सारखं आयुष्य मिळायला हवं, कोड असूनही तो नस्तानाबूत करण्याची शक्ती जशी श्रीपाळ यांना मिळाली तशीच ती आपल्यासुध्दा प्राप्त व्हावी. अर्थात यासाठी नैनासुंदरीचा वाटा हा सिंहाचा असला तरी त्यांनी भगवंतांचे आभार मानले. आपल्याला नीट नेटके करण्यात परमार्थाचा खूप मोठा वाटा आहे, असे श्रीपाळ यांना वाटत होते. त्यांना हेही वाटत होते की, एवढी सुंदर नैनासुंदरी आपल्याला बायको म्हणून मिळाली हे आपले भाग्य असले तरी आपल्याला कोड असल्यामुळे तिच्या इच्छा- आकांशा आपण पूर्ण करु शकत नाहीत, याची खंत त्यांना सारखी वाटत होती. म्हणूनच ते नेहमी म्हणायचे की, नैनासुंदरी तू रुपवान आहेस, तू माझ्या नादाला लागू नकोस, मला सोडून जा, आणि चांगल्या पुरुषांशी लग्न कर! परंतू ऐकेल ती नैनासुंदरी कसली! तिने श्रीपाळ यांचे म्हणणे ऐकले नाही. ती आपल्या मतावर ठाम राहिली आणि श्रीपाळ सोबतच आपला संसार थाटला. श्रीपाळ यांच्यासोबत मी खूप समाधानी, आनंदी असल्याचे ती नेहमी सांगायची, असे सांगून साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी आपल्या प्रवचनातून भगवंताबद्दल इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.