Sagevaani.com /जालना: जेव्हा मनुष्याला दु:ख येते, तेव्हा तो घायाळ होतो, विचलित होऊन जातो, परंतू त्याच्या जीवनात जेव्हा आनंद येतो तेव्हा मात्र तो निराशा झटकून कामाला लागतो. परंतू जेव्हा हाच आनंद आत्म्यापासून येतो तेंव्हा तो ना आनंदी होतो ना दु:खी! अशा आनंदासाठीच आपणाला हवाा आहे तो आत्म्ंयापासून मिळालेला आनंद, असा हितोपदेश साध्वी हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना साध्वी हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, उराध्यायन सुत्र हे जीणवाणी आहे, ती प्रत्येकाने श्रवण केलीच पाहिजे. जेव्हा मनुष्याला दु:ख येते, तेव्हा तो घायाळ होतो, विचलित होऊन जातो, परंतू त्याच्या जीवनात जेव्हा आनंद येतो तेव्हा मात्र तो निराशा झटकून कामाला लागतो. परंतू जेव्हा हाच आनंद आत्म्यापासून येतो तेंव्हा तो ना आनंदी होतो ना दु:खी!
अशा आनंदासाठीच आपणाला हवाा आहे तो आत्म्ंयापासून मिळालेला आनंद हा केव्हाही चांगलाच आहे. त्यामुळे मनुष्य ना दु:खी होतो ना सुखी! प्रवचनाच्या प्रारंभीच त्यांनी, प्रभू की अंतीम वाणी, सुनलो और सुनावो, जीवन धन्य बनालो हे सुंदर असे गीत गाऊन त्या म्हणाल्या की, एकोनतीस आध्यायाचा अर्थ आपण सर्वांनी समजावून घेतला आहे, आता तीसाव्या अध्यायात प्रभूंनी कशाचे म्हत्व समजावून सांगितले आहे तर ते आहे तपाचे! धर्म कोणताही असू द्यात त्या धर्मामध्ये तपाला अनन्य साधारण असे म्हत्व प्राप्त आहे. तप मग ते कोणत्याही प्रकारचे असू द्यात ते तप आपण सर्वांनीच केले पाहिजे.
त्यातच खर्याअर्थाने सौख्य सामावलेले आहे. मुस्लीम धर्मात दिवसभर काहीही खात नाहीत, उदा. रोजा! हा उपवास केला जातो. कोणी फराळ करुन तप करंतं तर कोणी म्हणजे आपल्या जैन धर्मात कोणी दोन वेळा जेवण करतं तर कोणी एकवेळ! परंतू तप आवश्यक केलं जातं. तर एकतीसाव्या अध्यायात प्रभूंनी काय सांगितलं, तर चरण तप! चरण तप म्हणजे आहे तर तुम्ही जे समजता ते नाही! असेही त्यांनी शेवटी सांगितले. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन करुन सर्वांचे आभार मानले.