Sagevaani.com /जालना: प्रवचनाच्या प्रारंभीच जीवन धन्य बनालो, हे गीत गाऊन त्यांनी आपल्या प्रवचनास प्रारंभ केला. त्या म्हणाल्या की, मानवाने जन्माला आल्यानंतर आपले जीवन कशाने धन्य बनेल, हे शोधले पाहिजे, परंतू दुर्देवाने तो हे शोधू शकत नाही, अशाने कसे त्याचे जीवन धन्य बनेल, असा हितोपदेश साध्वी प. पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना साध्वी प. पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, कालपयर्ंत आपण सव्हीसव्या सुत्राचा अर्थ जाणून आजपासून सत्तावीस आणि त्यापुढील अध्यायाचा अर्थ समजावून घेणार आहोत. तर प्रभूंनी सत्तावीसाव्या अध्यायात काय सांगितले आहे की, संघ सांगेल तसे आम्हास वागावे लागते, त्याप्रमाणे बोलावे लागते. परंतू अठ्ठावीसाच्या अध्यायानुसार आपल्याला मोक्षाला जावे वाटते. तथापि, त्यानुसार आपण वागत नाहीत. प्रभूंनी हा मार्ग उत्तम मार्ग सांगितला आहे.
प्रभूंनी दाखवलेला हा रस्ता आपल्या आत्म्यास निश्चितपणे मोक्षापर्यंत घेऊन जाईल. परंतू तसे कर्म आपण केले तर! हा रस्ता औरंगाबाद किंवा हैद्राबादला जाणार नाही, तर तो थेट मोक्षाला घेऊन जाणारा रस्ता आहे, त्याचे अनुकरण आपण केले पाहिजे. प्रभूंनी सांगितलेला हा मार्ग, रस्ता थेट मोक्षाला घेऊन जाणारा आहे. परंतू आपण नेहमी सम्यक होना मिथ्याव नही होना,असे सांगून त्यांनी उत्तराध्यण सुत्राबद्दल विविध उदाहरणाव्दारे माहिती दिली.
त्यानंतर साध्वी प. पू. सत्यसाधानाजी म. सा. यांनीही थोडक्यात मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, आपण खरोखरच सौभाग्य शाली आहोत. कारण गेल्या काही दिवसापासून आपण प्रभूंची वाणी ऐकत आलो आहोत. दररोज ही वाणी आपण श्रवण करतो, असेही त्यांनी शेवटी सांगितले. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन करुन सर्वांचे आभार मानले.