Sagevaani.com /जालना : पुण्यकर्म पदरात पाडू घ्यायच ेअसेल तर जीवन जगायचे तर ते गौतममुनीसारखे जगावे, असा हितोपदेश साध्वी प.पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या.
प्रवचनाच्या प्रारंभीच छोट्या साध्वींनी गौतममुनींवर गायिलेल्या गितावर आधारीत पुढे बोलतांना संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. म्हणाल्या की, आताच आपण सर्वांनी छोट्या साध्वींचेप्रवचन ऐकले आहे. त्यांनी अत्यंत चांगले असे प्रवचन सांगितले आहे.
संसारात राहुनही आपण प्रभूंची आराधना करु शकतो, हेच गौतममुनींनी शिकवले आहे. आपण सामायिक करतो. पण कसे करतो, सामायिक करतांना नियमाचे पालन हे केले पाहिजे, असे सांगून त्यांनी गौतममुनीबद्दल इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.