जालना : ज्याच्या जीवनात विनय नाही, तो मनुष्य प्राणी नाही. विनय असल्याने काय होते. ज्याच्याकडे विनयाची भावना आहे, काया आहे, तो प्राणी सातत्याने विजयात राहतो, म्हणूनच म्हटले आहे की, जीवनात विजय असला पाहिजे, असा हितोपदेश साध्वी प.पू. ुगुरुछायाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या.
प. पू. गुरुछायाजी म. सा. म्हणाल्या की, आपण आपल्या जीवनात विनय उतरवला की नाही, हे माहित नाही. परंतू विनय असलाच पाहिजे. आता दिवाळी आली आहे. आपण आपले घर पूर्णपणे साफ करताल, परंतू आतून काय? आपल्या आत्म्याचे कपाट कचरा, जाळ्यांनी भरलेले आहे, ते कोण कधी साफ करणार! अगोदर ते साफ करा आणि नंतर वरवरचे घर! असे सांगून त्या म्हणाल्या की, सुर्य आहे म्हणून चमक आहे, मधुरता के कारण अमृत प्रिय है। शितलता के कारण चंद्रमा प्रिय है।
विनय के कारण आनंद सबको प्रिय लगता है। विनय के कारणही अपुन सब है। नही तो कोई भी नही! म्हणून जीवनात विनय असला पाहिजे. ज्याच्याकडे विनय नाही तो पुरुष नाही. व्यक्तीच्या जीवनात विनय असला पाहिजे. विनयाचे भाव ज्याच्याकडे नाहीत, त्याच्याकडे सर्वस्व असूनही तो काहीही नाही. म्हणून प्रत्येकाकडे विनय असला पाहिजे, असे सांगून त्यांनी विनयाबद्दल विविध उदाहरणाव्दारे इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.