Sagevaani.com /जालना: बगर घताचं घर कसं असेल? ज्या घरात सुर्यप्रकाशही येतो आणि थंडीही येते, अगदी तसेच आपल्या जीवनाचे आहे. आपल्या जीवनात गुरु असायलाच हवेत, असा हितोापदेश साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. आज प्रवचनाचा शेवटचा दिवस, परवा तर आम्ही जाणार आहोत. बिदाई! या शब्दाशी आपली खूप नफरत! या शब्दाचा आपल्याला खूप- म्हणजे खूप राग येतो. व्देषही वाटतो. परंतू केव्हा ना केव्हा तरी जाणे आहेच! चातुर्मास संपला म्हणजे काय झाले. होनी को कोण टाल सकता है! असे सांगून त्या आज संघात खूप रडल्या! त्यांना अश्रू अनावर झाले!
त्या पुढे म्हणाल्या की, आपल्या जीवनात गुरु नसतील तर ते घर म्हणजे बिना छत का घर! जहाँ सर्दी और गर्मी भी रहती है! अगदी असंच आहे आपल्या जीवनाचं, आपल्या जीवनात गुरु नसतील काय होतं, हे ज्यांना गुरु नाहीत त्यांना विचारावं! गुरु हे आपल्या जीवनात असायलाच हवेत, असेही शेवटी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी सांगितले. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन करुन सर्वांचे आभार मानले.