Sagevaani.com /जालना: जपालाही खूप महत्व आहे, आपण येथे तर दररोज जप करतो. मात्र आपल्या घरी सुध्दा तसे वातावरण असायला हवे, असा हितोपदेश साध्वी प. प. सत्यसाधनाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या.
तत्पूर्वी साध्वी प. प. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी पुढे बोलतांना साध्वी प. प. सत्यसाधनाजी म. सा. म्हणाल्या की, जपालाही खूप महत्व आहे, आपण येथे तर दररोज जप करतो. मात्र आपल्या घरी सुध्दा तसे वातावरण असायला हवे, तरच आपली मनोकामना पूर्णत्वत्वास जाईल. अन्यथा नाही.
आपण येथे करत असलेला जप हा कोणत्या उद्देशाने करत आहोत, तो का केला जातो, तर त्याचेही खूप अनन्यसाधारण असे महत्व आहे. म्हणून तो केला जातो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलतांना साध्वी प. प. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, भगवान महावीरांची अंतीम वणिी आपण
आपण उत्तरायण सुत्राच्या रुपाने गात आहोत. ही चांगली बाब आहे. कालपर्यंत तेरा अध्यायांची माहिती घेतली. आता चौदावा अध्यायाचा अर्थ काय सांगतो.
बारा कोसावर भाषा बदलते. हा बदल आपण पाहणार आहोत. जालन्याच्या आणि जळगांवच्या भाषेत बदल आहे. आता हा बदल का आहे. याच्या खोलात आपणाला जायचे नसले तरी असे सांगून त्यांनी प्रभू महावीर आणि उत्तरायण सुत्राबद्दल विविध उदाहरणाव्दारे इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.