श्रीरामपूर दि. 30 (वार्ताहर) : चांगले कर्म म्हणजे पूण्य केले तरच त्याचे चांगले फळ म्हणुन जास्तीत जास्त चांगले कर्म केले तर घराचे एैश्वर्य वाढेल, वडील धार्यांच्या पुण्याई वरच घर चालते असे प्रतिपादन जैन स्थानकमध्ये चातुर्मासार्थ घर या विषयावर प्रवचन देतांना प्रज्ञाज्योती पूू. श्री. विश्वदर्शनाजी यांनी केले.
प्रत्येक चांगल्या कर्मात पूण्य असते म्हणुन ज्या घरात चांगली कर्मे होतात तेथे सकारात्मक उर्जा वाढते असे स्पष्ट करुन त्या म्हणाल्या की धर्माचरण करीत रहा, चारित्र्य संपन्न जीवन जगा, संयम पाळा, म्हणजे सुख शांतीचा अनुभव येईल. संकटाना धीराने तोंड द्यावे, वाईट कर्माचे फळ वाईटच असते, घरात सात्वीक वातावरण ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच असते, मनात उदारता, र्हदयात पवित्रता असेल तर घरात आंनद टिकतो आपण माणुस आहोत माणसाप्रमाणे वागण्याचे शिका.
आजकल घरे मोठे झाले, पण मन छोटे झाल्याची खंत व्यक्त करुन पू. विश्वदर्शनाजी म्हणाल्या की, दुसर्याबद्दल द्वेष नको, वाणीत मधुरता हवी, वाणी नेहमी ओजरची हवी, गोड बोलल्यामुळे एकमेका विषयी गैर समज दूर होतात. नविन ओळखी करुन घ्या, संपर्क वाढविला तर तो उपयोग पडतो.
जपामुळे मनाची एकाग्रता वाढते, आपल्या स्वभावात उदारता ठेवावी, उदारतेमुळे परोपकारी वृत्ती वाढते, दुसर्याबद्दल नेहमी चांगली भावना असावी असे पू. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी प्रवचनातुन स्पष्ट केले.
विद्याभिलाषी पू. श्री. तिलकदर्शनाजी प्रवचनातुन म्हणाल्या की, लोहचुंबक आत्मा व कर्मला खेचत असते, क्रोध, माया, लोभ, मनवचन काया प्रवृत्तीस आत्मा खेचत असतो, आत्म्यास दूर खेचत असतो, आत्मा मुळ स्वभावात आणा, तारक कर्म करण्याची साधना करा असे स्पष्ट केले.