श्रीरामपूर दि. 15 (वार्ताहर) : वास्तुशांती करुन देखील घरात शांतता नांदत नसेल तर काही अर्थ नाही, मनाची शांती केली तर घरात स्वर्ग निर्माण होईल असे प्रतिपादन प. पू. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी केले.
आपण मोठ्या हौसने पैसे खर्च करुन घर बनवतो पण यात शांतंता असेल तर घर म्हणुन ओळखले जाईल. त्या घरात आई बाप वयस्कर माणसे, एकमेकांशी प्रेमाने वागणारी माणसे हवीत असे स्पष्ट करुन त्या म्हणाल्या की, एकमेकांचे ऐकणे, एकमेकांचे मनाशी मिसळुन राहीले तर घरांत स्वर्ग सुख लाभणार आहे, जर आपण एकमेकांशी जुळते घेऊ, विचार समजुन घेऊ त्यावेळी घरात शांतता टिकण्यास मदत होते, जेथे शांती तेथे अमृताचा वर्षाव गरजलेले आहे.
घर ज्या पाच खांबावर उभे राहते ते खांब मजबुत असावेत, जोपर्यंत घराच्या भिंती मजबुत आहेत तोपर्यंत कुणीही घराचे तुकडे करु शकत नाही, याकरीता घरातील सर्व सदस्यांनी आपापलात प्रेमाने बोलणे, वडिलधारी माणसांचा आदर ठेवने गरजेचे आहे, ज्या घरात शांतता आहे ते घर इतरांपुढे आदर्श ठरते.
घरातील वडिलधार्यांचा अनुभव सर्वांना उपयोगी पडतो, अनुभवाचे शिक्षण घरातच मिळते, शाळा कॉलेजमध्ये नाही, ज्या घरात वडीलधारी नसतात त्या घरात कायम कटकटी असतात, कोणतीही बिकट प्रसंग आली तर त्यावर मार्ग काढायचा याचे ज्ञान अनुभवी वडीलधार्यांकडे असते, वडीलधारी सर्वांना प्रेमाच्या धाग्यात बांधुन ठेवतात, वडीलधार्या माणसांच्या अनुभवाचे मार्गदर्शन मिळते, त्यामुळे घरांतील शांतता टिकली जाते, म्हणुन घरात वडीलधारी माणसे आवश्यक आहे असे त्यांनी स्पष्ट केले.