श्रीरामपूर दि. 17 (वार्ताहर) : माणसांच्या चुकीमुळे नव्हे तर एकमेकांमधील गैर समजुतीमुळे घराचे तुकडे होतात. म्हणुन परस्परांशी एक दिलाने वागुन घरांचे घरपण टिकविण्यासाठी घरांतील सर्वच सदस्यांची असते असे प्रतिपादन जैन स्थानकमध्ये चातुर्मास निमित्त घर या विषयाचे महत्व विषद करतांना पू. श्री. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी केले.
ज्या घरात प्रेम असते ते घर आदर्श असते, घर म्हणजे सद्गुुणांनी उपासना होय. घरपण टिकविण्यासाठी आपआपसातील प्रेम भावना असलीच पाहिजे, असे सांगुन त्या म्हणाल्या की, नाती टिकली तरच घरच शाबुत राहील. घरात नात्याची जोपासना करावी लागते. सद्गुणांचे वैभव असेल तर बाहेरच्या वैभवाला किंमत देण्याची गरज नाही व प्रत्येक क्षण सुखाचा जाईल घरातील माणसांनी केलेल्या चुकीकडे दुर्लक्ष करुन त्या व्यक्तीला जवळ केले तर घरातील एैक्य मजबुत राहते, माणसांकडुन चुका होणे अपेक्षीत आहे. पण त्या चुकांमुळे गैरसमज निर्माण होतात. चुका टाळण्याचा प्रयत्न करावा.
चुकांवर दुर्लक्ष करुन त्या व्यक्तीला जवळ केले तर अनेक प्रश्न सुटतात, ज्या ठिकाणी मन मजबुत असते तेथे सर्व काही चांगले असते, घरातील प्रत्येकांवर आपला विश्वास हवा, विश्वासाचे नाते हे महत्वाचे आहे. प्रत्येकाने नम्रतेचा स्विकार केला पाहिजे, ज्येष्ठाचा आदर करणे, एकमेकांशी प्रेमाने राहण्यात शाहणपणा आहे. केवळ नम्रपणाने वागले तरी सुध्दा एकमेकातील संबंध घट होतात. मनापासुन नम्रता अंगी बाळगावी एकमेकांना प्रेमाचे धाग्यांनी बांधले तर बाहेरचा कुणही घर तोडण्यची हिंमत करु शकणार नाही. असे पु. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी प्रवचनातुन स्पष्ट केले.
पू. श्री. तिलकदर्शनाजी म.सा. प्रवचनातुन उपदेश देतांना म्हणाल्या की, सुदैवाने मानव जन्म मिळाला आहे परंतु आपणास कोठे जावयाचे हे विसरले आहेत. घर व रस्ता प्रभु दाखवितो, ध्येय प्राप्ती साठी सद्भावनांचा संकल्प करा, जो उपकार करतो, सेवा करतो, सद्भावाचे उपकाराची परत फेड करा.