श्रीरामपूर दि.13 (वार्ताहर) प्रत्येकाच्या जीवनात पाणी व वाणी याला खूपच महत्व आहे. दोन्हीचा वापर संयमाने केला नाही तर पश्चातापाची वेळ येईल.गुरुकृपा मिळाली कि, सर्व संकटाचे निवारण होते. पण त्याकरिता गुरुवार अटल श्रद्धा हवी त्यांच्या विचारानुसार वागले तर जीवनाचे सोने होईल. असे विचार प्रखर व्याख्यात्या साध्वी पू. श्री विश्वदर्शनाजी म .सा यांनी चातुर्मास प्रारंभ प्रवचनाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.
पू. विश्वदर्शनाजी गुरुपौर्णिमेचे महत्व विषद करताना म्हणाल्या ,चातुर्मास हा ज्ञान प्राप्तीचा काळ आहे. वाणीवर संयम ठेवण्याचा निर्धार करावा .चातुर्मासात जितकी धर्म साधना ,उपासना कराल त्याचे चांगले फळ मिळेल. असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या कि धर्म स्थानकात परवानगी शिवाय प्रवेश मिळेल .कोणतीही देणगी द्यावी लागत नाही. प्रत्येकाने धर्मानुसार नियम पाळलेच पाहिजे. तरच जीवनात आनंद निर्माण होईल .
गुरुवर श्रद्धा ठेवावी आपले दिल त्याचे ताब्यात दिले तर गुरु सर्व सांभाळून घेतात .गुरूचा हात धरला तर सर्व संकटे दूर होतात .गुरुची साथ सोडू नका.त्यांचे विचार ऐका व मनन करा त्याप्रमाणे वागा.गुरुचरण ,गुरुस्मरण ,गुरुशरण हि त्रिसूत्री लक्षात ठेवा .वेळेची किंमत ओळखावी वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करावा लागतो. असे त्यांनी स्पष्ट केले.
पाणी व वाणी व संयम नसेल तर अनर्थ घडतो. पाणी मनुष्याचे जीवन सुखी करते . तर वाणीमुळे माणसांवर संस्कार घडतात .चातुर्मासात धर्म आराधना करा.विद्याभिलाषी प.पु. तिलकदर्शनाजी म .सा यांनी जगात कोणीच कोणाचे नसते.फक्त गुरूच मार्गदर्शन करतात .गुरूचा आशीर्वाद असेल तर सर्व काही शक्य होते. गुरुची सेवा करून पुण्य मिळवा असे सांगितले,