जालना : गुरु हे सर्वात मोठे आहेत. गुरुशिवाय कोणतेही काम पूर्णत्वास जात नाही, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. असा हितोपदेश साध्वी प.पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. तत्पूर्वी साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी कालच्या प्रचवनाचा थोडक्यात आढावा घेऊन त्या म्हणाल्या की, राजा श्रीपाळ म्हणतो की, आपण खूप दयाळू आहात. आपण माझ्याकडे भोजन करायला यावे, अशी विनंती राजा श्रीपाळ यांना करतो, परंतू ना ओळख ना पाळख तरीही हा माणूस आपल्याला का म्हणून बोलावत असेल.
असे म्हणून श्रीपाळ शेवटी त्याच्याकडे भोजन करायला जातात. जेवता- जेवता राजा आपल्या मुलीशी विवाह करण्याचे त्यांना सांगतात. ते थोडावेळ दबकतात. शेवटी तयार होतात. धुमधडाक्यात दोघांचाही विवाह होतो. ते दोघेही आनंदीत राहतात, असे सांगून त्यांनी श्रीपाळची प्रवचनातून इंत्यभूत माहिती दिली. त्यानंतर संधारा प्रवर्तिका साध्वी प. पू.सत्यसाधनाजी यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, आपण साध्वींच्या मुर्खाविंद से सुन रहे हैे! गये पाच दिन से आपूण श्रीपाळ का चरित्र सून रहे है! , असे सांगून साध्वी सत्यसाधनाजी म्हणाल्या, गुरुचे स्थान फार मोठे आहे. आपण प्रत्येकाने गुरु तर केला असेलच! गुरुंना वंदन, नमस्कार केला पाहिजे.
भगवंतांनी किती वंदन केले? बाकी किती राहिले. लोक काय म्हणतात, याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला काय करायचे ते ठरवा, आणि अंमलात आणा, असे त्यांनी शेवटी सांगितले. त्यानंतर त्यांनी बाहेर गावाहून आलेल्या पाहुण्यांबद्दल माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.