Sagevaani.com /जालना: दिवाकर सप्ताहाचा आजचा सहावा दिवस! उद्या दिवाकर प.पूू.चोथमलजी म. सा. यांचा जन्म दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यांनी दिक्षा घेतली तेव्हा केवळ पाच लोकं त्यांच्यासोबत होते आणि आता! आपली आत्मा परमात्मा बनावी, असे वाटत असेल तर अशा प्रभूंचे सातत्याने गुणगाण करायला हवे, असा हितोपदेश साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला. तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती. आजही संघामध्ये साध्वी प. पू. अर्हतज्योतीजी म. सा. यांनी विविध प्रकारचा जाप केला.
साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाल्या की, प्रारंभापासून प. पू. चोथमलजी म. सा. यांचे जीवन कार्य हे संघर्षात गेले. त्यांचे वडील गेल्यानंतर आईला वाटले की, त्यांचे लग्न लावून द्यावे. त्यांचे लग्नही झाले. परंतू आईने जेव्हा संयम घेण्याचे ठरवले तेव्हा चोथमलजी म. सा. सुध्दा म्हणाले, मलाही दिक्षा घ्यायची आहे. आईला हे ऐकून धक्का बसला. परंतू आई म्हणते, कालच तुझे लग्न झाले. पत्नी माहेराला गेली आहे. आज तु दिक्षा घेणार आहेस? जेथे आई असेल तेथे मी! असे चोथमलजी म. सा. यांनी आईला सांगितले. तेव्हा मात्र आई हरते.
ते आपल्या निर्णयावर ठाम राहतात. अखेर ते दिक्षा घेतात. दिक्षा घेतात कुठे तर एका विशाल वृक्षाखाली! तीथे अवघे पाच जण उपस्थित असतात. ते शेत खाली पडलेले असते. परंतू त्या शेतावरही एका जणांंची दृष्टी पडते, आणि तो ती जमीन विकत घेण्याचा विचार करतो. परंतू मालक मात्र ही जमीन विकण्याला विरोध दर्शवितो. अनेक त्यांना ती जमीन मागतात. मात्र ती विकण्यास नकार देतात. एक दिवस त्यांच्या मनात येते की, ही जमीन आपण नांगरून काढू म्हणजे कुणी आपल्याला जमीन मागणार नाही, असे म्हणून ते त्या जमीनीमध्ये टॅक्टर घालतात. परंतू टँक्टरला सर्वत्र साप घेरतात. तो टॅक्टर चालक कसा- बसा घरी पोहचतो.
घेणाराने ही जमीन फुकट सुध्दा घेऊ नये, त्यानंतर धुळ्याचे एक माऊली त्या जाते. काही नाही तर तेथील थोडी माती घेऊन जाऊ, ती एका पन्नीत माती टाकते. निघू लागतात. परंतू एका जंगलातच त्यांची गाडी बंद पडते. गाडी चांगली असूनही का बंद पडली, कोणत्याही मोबाईलला नेटवर्क नाही, असे का होते. याचा विचार करत असतांनाच त्या मातीची आठवण त्यांना होते. परत ती माती जेथे होती, तेथे टाकून येतात.
इकडे त्यांची गाडी सुरु होते. गुरुचे असेच असते. म्हणून गुरुला नेहमी आपण आठवणीत ठेवले पाहिजे. ते जे सांगतात, ते ऐकले पाहिजे, असे सांगून साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी आपल्या प्रवचनातून विविध उदारणे दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.