जालना : आपण जालनावासिय धन्य आहेत, आपल्यावर सतत गुरु गणेशलालजी म. सा. यांची कृपादृष्टी राहिलेली आहे, राहत आहे, ज्यांच्यावर गुरुंची कृपा असते, त्यांच्या कोणतेही संकट येत नाही, असा हितोपदेश साध्वी प. प. सत्यसाधनाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. तपोधाममध्ये गुरु गणेशलालजी म. सा. यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी पुढे बोलतांना साध्वी प. प. सत्यसाधनाजी म. सा. म्हणाल्या की, आपण जेथे चातुर्मास करायला जातो, तेथे- तेथे गेल्याबरोबर आणि जातावेळेस आजारी पडत असतो, परंतू त्यास जालना हे अपवाद ठरले आहे. आमच्या साध्वीही आश्चर्य चकीत झाल्या आहेत, ही कशाची कमाल आहे तर गुरु गणेशलालजी महाराज यांची! आपण जालनावासिय धन्य आहेत, आपल्यावर सतत गुरु गणेशलालजी म. सा. यांची कृपादृष्टी राहिलेली आहे, राहत आहे, ज्यांच्यावर गुरुंची कृपा असते, त्यांच्या कोणतेही संकट येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
जसा आपल्याला विश्वास आहे, त्याप्रमाणे भगवंतही आपल्या पाठीशी उभे राहतात. असे सांगून त्यांनी आजच्या दिवसाबद्दल विविध उदाहरणाव्दारे इंत्यभूत माहिती दिली. तत्पूर्वी साध्वी प. पू. प्रशांतकवंरजी म. सा. यांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर साध्वी प. प. सत्यसाधानाजी म. सा.यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन करुन सर्वांचे आभार मानले.