श्रीरामपूर दि. 1 ( वार्ताहर ) जीवन गोड व्हायचे असेल तर वाईट गोष्टी विसरणे आवश्यक आहे.कोणी कितीही अपशब्द बोलले तरी त्याला प्रतिउत्तर देऊ नये.गलत बातों को डिलीट करो,अच्छी बातों को सेव्ह करणा सीखो असे प्रतिपादन प.पू. श्री.विश्वदर्शनाजी म.सा यांनी केले.
जीवनात आपल्याला चांगले वाईट अशा दोन प्रकारचे लोक भेटतात बोलणे वेगवेगळे असते पण चांगले कोणते वाईट कोणते आपल्याला समजले पाहिजे.चांगले ऐकावे व अपशब्द एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने द्यावे मनांत विचारांचे काहूर माजत नाही.वाईट विचार सोडले तर मेंदूला बधिरता येते वाईट शबदांऐवजी मधुर शब्द वापरले तर आपण एकमेकातील दुरावा कमी करू शकतो.आनंद आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो. तीर्थयात्रेपेक्षा दुप्पट आनंद आनंद यात्रेपासून मिळतो.तीर्थयात्रेत आपल्याला सामान द्यावे लागते पण आनंद यात्रा कोणत्याही सामानाशिवाय करता येते असे स्पष्ट करून त्यांनी सांगितले कि, आनंद यात्रेतून परमानंद प्राप्त होतो. जीवनात समता,सहनशीलता आणि सरलता हवी मधुर भाषा संसाराला जोडते गुरुदेव आपल्याला शांतीचा संदेश देतात. वितसंगता आणली तर मनस्ताप राहते.
एकवेळ कपड्यावर पडलेले डाग धुतल्यावर जाऊ शकतो पण वाईट शब्दामुळे काळजावर पडलेला डाग लवकर जात नाही. क्रोध,मान, माया,लोभ यापासून दूर राहिले तर तुम्ही परंपदावर पोहचू शकाल क्षमा करणे हा उत्तम गन आहे.आपण गुरूंचे विचार सतत ऐकावेत विचारांमुळे मनःशांती मिळते. कोणालाही शब्दाने दुखावू नका रुजुता असते तिथेच धर्म टिकतो सर्वांचे कल्याण असेच विचार पाहिजेत सरळ लाकडाची काठी असेल तर तरच झेंडा लावता येतो वाकड्या तिकड्या काठीवर झेंडा लावताच येत नाही. आपले विचार स्वच्छ,निर्मळ सरळ असावेत म्हणजे जीवनाचा आनंद घेता येईल. असे त्या म्हणाल्या