Sagevaani.com /जालना: जप, तप, आणि आराधना जेव्हा आपण करत असतो, त्यावेळी आपले कर्म बांधिले जातात, त्यासाठी आपला भाव सुध्दा महत्वाचा आहे. भावच नसेल तर आपले कर्म सुध्दा बांधिले जात नाही, म्हणुन प्रत्येकाने कर्म करतांना भाव चांगलाच ठेवा, असा हितोपदेश साध्वी हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना साध्वी हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, कालपर्यंत आपण बत्तीस अध्यायाचा अर्थ समजावून घेतला आणि आता त्या पुढील भागाचा अर्थ समावून घेणार आहोत. तेहतीसाव्या अध्यायात भगवंंत प्रभूंनी कर्माबद्दलची माहिती सांगितली. जर का आपले कर्म उत्तम राहिले तर जीवन आपले कर्तृत्ववान झाले, फळाला आले असे समजावे. जप, तप, आणि आराधना जेव्हा आपण करत असतो, त्यावेळी आपले कर्म बांधिले जातात, त्यासाठी आपला भाव सुध्दा महत्वाचा आहे.
भावच नसेल तर आपले कर्म सुध्दा बांधिले जात नाही, म्हणुन प्रत्येकाने कर्म करतांना भाव चांगलाच ठेवा, असे सांगून त्या म्हणाल्या की, प्रभूंनी आम्हाला जाता- जाता उत्तराध्यायन सुत्र दिले असले तरी छत्तीसव्या अध्यायात संपूर्ण सार दिलेला आहे. जो कोणी या स्मरण करील, त्याच्या संपूर्ण इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहात नाहीत, परंतू तुम्ही म्हणाल की, हा अध्यायही खूप मोठा आहे. परंतू यातील छोट्या- छोट्या ओळी लक्षात ठेवायला हरकत नाही, असेही त्यांनी शेवटी सांगितले. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन करुन सर्वांचे आभार मानले.