Sagevaani.com /जालना: काल आपण सर्वांनी मेष आणि वृश्चिक राशीबद्दल माहिती घेतली आज मिथुन आणि कन्या राशीबद्दल बघणार आहोत. कन्या राशीचे लोक खूप हुशार असतात. परंतू आपल्या हुशारीचा उपयोग कुठे आणि कसा करावा हे त्यांना कळेलच असे नाही, असा हितोपदेश संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा.यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती. आज चौथ्या दिवसीही संघामध्ये विविध प्रकारचा जाप करण्यात आला. चोवीस तीर्थंकरांपैकी नऊ तीर्थंकरांचा जाप नियमितपणे करत आहोत. ही चांगली बाब आहे.
पुढे बोलतांना संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. म्हणाल्या की, मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी एक म्हणजे बुध आहे. एकदा एक आई आपल्या मुलांला सांभळण्यासाठी एका स्त्रिकडे देते. परंतू होते काय की, तीही स्त्रि त्या मुलाचा हट्ट सोडत नाही, हे मुल आपलेच आहे, असे ती सांगते. असे करता- करता ही बाब थेट राज दरबारात राजाकडे जाऊन पोहचते. तेथे महामंत्री म्हणून अभयकुमार असतात. परंतू महामंत्र्यांनी जोपर्यंत राजा काही आदेश देत नाही तोपर्यंत काहीही बोलायचे नाही. शेवटी राजाचे फर्मान! महामंत्री अभयकुमार तोपर्यंत गप्पच असतात. परंतू जेव्हा या मुलाची बाब दरबारात जाते तेंव्हा राजा आपल्या अभयकुमारांना फर्माण सोडतात. की, या मुलाचा निवडा तुम्हाला करायचा आहे, आणि महामंत्री अभयकुमार ठरवतात की मुलांचे दोन तुकडे करायचे, एक तुकडा हिला द्यायचा आणि दुसर्या तुकडा दुसरीला द्यायचा! तेंंव्हा त्या मुलाची खरी म्हणते सदर मुलं हे आपल्या डोळ्यासमोर तरी राहील. अभयकुमार म्हणतात, महाराज फैसला झाला.
हे मुल याच स्त्रीचं आहे. जीने या मुलाचा छेद करायया विरोध केला. जी स्त्री गुपचूप बसली तीचे हे मुल असू शकत नाही. शेवटी अभयकुमारांनी अवघ्या एका मिनिटात फैसला केला. असेही संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.