Sagevaani.com /जालना: संघात आपण गेले तीन दिवसापासून श्री. संत चोथमलजी म. सा. यांचा सप्ताहाह साजरा करीत आहोत. आज रोजी तीन दिवस झाले. म्हणजे काय तर आपल्याला तीनला घालवायचे असून तीनला जिवनात उतरवायचे आहे. कोणत्या तीनला जीवनात उतरवयाचे आहे तर ते तिघेही सम्यक आहेत. सम्यक धर्म, सम्यक ज्ञान आणि सम्यक दान! हे कधीही आपल्या कामास येणार आहे, असा हितोापदेश साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, एकवेळची घटना आहे. राजस्थानातील ही घटना आहे. एक महाराज, संत गोचरीसाठी बाहेर गेले. त्यांनी गोचरीही घेतली. ते आपल्या मार्गाने जात असतांनाच एक मुस्लीम आला आणि त्याने एक पोटळी बांधलेली त्यांच्या गोचरीत टाकली. ते साधू महाराज आपल्याच नादात तल्लीन होते.
त्यांना माहितही नाही की, कोणी तरी त्यांच्या गोचरीत मांस बांधलेली पोटूळी त्यांच्या गोचरीत टाकली म्हणून! ते त्यांच्या ठिकाणावरही आले पंरतू पाहतात तर काय तेथे संपूर्ण मुस्लीम समुदाय जमलेला! तुम्ही कसले जैन! तुम्ही तर कलंक आहात, अशाप्रकारे ते बोलू लागले. इकडे सर्व संत समुदाय शांत झाला. आता काय करावे, हेही त्यांना सुचेना. परंतू तेवढ्यात एक जण म्हणाला, मी चोथमल म. सा. यांच्याकडे जाऊन येतो. तो आपल्या गाडीने निघाला. चोथमलजी म. सा. यांचे प्रवचन सत्तर किलो मीटर वर सुरु होतें. त्यांनी प्रवचन थांबवले. ते म्हणाले, क्या बात है! आलेल्या माणसाने त्यांना हकीकत सांगितली. मी येतो पाच- सव्वापाच पर्यंत, तोपर्यंत त्यागोचरीला कोणीही उघडू नका, असा निरोप घेऊन तो मनुष्य आला.
सत्तर किलो मीटरचे अंतर कापून चोथमलजी म. सा. कसे येणार, त्यांना दोन दिवस तरी लागतील, असेही काही जण म्हणू लागले. इकडे साडेपाच वाजले, तरीही गुरुदेव काही आले नव्हते. पावणे सहा वाजता त्यांचे आगमन झाले आणि सर्व संतांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतू मुस्लीम समुदाय संतप्त झाला. तो म्हणू लागला. आता तरी ही गोचरी उघडा, ती पोटळी उघडा, चोथमलजी म. सा. यांनी आदेश देताच ती गोचरी उघडली, ती मांस असलेली पोटूळीही सोडली, परंतू त्या पोटळीत काहीही निगाले नाही, शेवटी मुस्लीम समुदायाने माफी मागितली आणि यापुढे जैन महाराजांना, संतांना त्रास देणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली.
हे केवळ शक्य झाले ते चोथमलजी म. सा. यांच्यामुळेच ! असेही शेवटी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी सांगितले. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन करुन सर्वांचे आभार मानले.