श्रीरामपूर दि. 01 (वार्ताहर) : योग म्हणजे संतुलन होय, ज्याना शक्य असेल त्यांनी जरुर योगी बनावे, योगी बनता येत नेसल तर सहयोगी बना. परस्परांना मदत करणे हेच जीवन जगण्याचे सुत्र आहे. एकमेकांच्या मदती शिवाय आपण जीवनात प्रगती करु शकत नाही. जीवनाचा आंनद घ्यायचा असेल तर दुसर्यांना मदत ही केलीच पाहिजे असे प्रतिपादन प.पू. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी केले.
त्या म्हणाल्या माणसाजवळ पैसा नसेल तर चालेल पण चांगले विचार हवेत, त्या विचारांच्या जोरावर तो चांगले जीवन जगु शकतो, माणुस जन्म अतिशय दुर्लभ असल्याने एकमेकांच्या मदतीशिवाय जीवन जगने अशक्य आहे. प्रथम आपल्या घरासाठी उपयोगी ठरा नंतर बाहेरच्या लोकांसाठी उपयोगी व्हा, स्वार्थी दुनियेत कोण कोणाचा असेल याचा भरोसा नाही. धन सपंत्ती कडे माणुस ज्यादा लक्ष देतो आणि मानवतेकडे दुर्लक्ष करतो.
दुसर्यांच्या कल्याणाची इच्छा नेहमी ठेवावी. हाताच्या रेषांवर विश्वास ठेवण्यापेक्षा हाताने केल्या जाणार्या कर्मांवर विश्वास ठेवा, कर्मयोगी बनले तर जीवनात यशस्वी व्हाल, आपण अनेक मंदिर पाहतो पण स्वत:च्या मनालाच मंदिर बनविण्याचे प्रयत्न करावा, माणसाला जन्मापासुनच नात्यांचा बंधनात पडावे लागते, माणसांचा घरातील आणि बाहेरचा चेहरा वेगळा असतो, ज्यांच्या पाया मजबुत ते घर टिकावु असते, मानवतेची पुजा करावी दुसर्याच्या मनात घर करा.
जीवनात प्रेमाची धारा वाहु द्यावी, सदगती हवी असेल तर सदविचार हवेत, सहकार्य करण्याची भावना असावी असेही त्यांनी स्पष्ट केले.