Sagevaani.com /जालना: आपण आपल्या आयुष्यात आचार्यांसारखं वर्तन उतरवण्याचा प्रयत्न केला तर आपला देह सुध्दा परमात्मा बनल्याशिवाय राहणार नाही, परंतू त्यासाठी आपल्याला आचार्यंसारखं जीवन जगावे लागेल, असा हितोपदेश साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती.
पुढे बोलतांना साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, श्रीपाळ आणि नैनासुंदरीचं आयुष्य कसं होतं? याचाही विचार करायला हवा. सासू-सासर्यालाही आपला जावई ओळखू येत नाही. म्हणूनच नैनासुंदरीची आई आणि वडीलसुध्दा नैनासुंदरीला दोष देऊ लागले होते. परंतू मधल्या व्यक्तींनी तिच्या आई- वडीलांना समजावून सांगितल्यानंतर हाच आपला जावई असल्याची खात्री त्यांना पटली. आणि त्यांनी नैनासुंदरीला दिलेला दोष मागे घेत असल्याचे कबुल केले. म्हणूनच प्रत्येकाने आचार्य यांच्यासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. कारण सर्वात मोठा राष्ट्रपती असला तरी निर्णय घेणारा हा पंतप्रधानच असतो मात्र येथे समाजाचे निर्णय केवळ आचार्य घेत आहेत. म्हणजेच ते सुध्दा खूप मोठे आहेत.
आपल्या आत्म्याला परमात्म्यापर्यंत नेता येते. परंतू त्यासाठी आपल्यात आचार्य बनण्याची पात्रता यायला हवी. श्रीपाळ हा कोडफुट्या होता. परंतू तो बरा झाला तरीही प्रभूंना विसरला नाही. आपण तर आपले काम झाले की लगेचच प्रभूंना विसरुन जातो.परंतू श्रीपाळ आणि नैनासुंदरीचं तसं नसतं. त्यांच काम संपलं असलें तरी ते प्रभू विसरलेले नाहीत. ती वाणी आणि आपण आपले कर्तव्य अगोदर निट पार पाडतोय की नाही, हे पाहिले पाहिजे. त्याशिवाय आचार्यांना आपल्या जीवनात कसं काय उतरवू शकू! असे सांगून साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी आपल्या प्रवचनातून भगवंताबद्दल इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.