Sagevaani.com /जालना: अंहकारी आणि घमेंडखोर व्यक्ती आयुष्यात कधीच पुढे जात नाही, त्यासाठी मनुष्याने नेहमीच अहंकार आणि घमेंड बाजूला ठेवली पाहिजे, असा हितोपदेश साध्वी प. पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना साध्वी प. पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, उत्तराध्यायन सुत्र हे उगीच नाही. त्यामुळे आपल्या जीवनाचे निश्चितच कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच हे सुत्र सातत्याने आपल्या स्मरणात राहयला हवे. परंतू, दुर्देवाने मनुष्य हे सुत्र विसरत चाललाला आहे,त्यालां आपला नाविलाज असला तरीही व्यक्तींनी या सुत्राचा नेहमीच अभ्यास करावा, नेहमीच त्याचे चिंतन आणि मनन करावे, ज्यामुळे आपले कर्म चांगले उपजेल, आणि आपल्याला सन्मार्ग मिळेल, असे सांगून त्या म्हणाल्या की, जप हा नेहमीच करायला हवा. त्यामुळे आपले जीवन सत्कर्मी लागल्याशिवाय राहत नाही.
आजही आपण जप केला. त्याचे काही तरी कारण असेल, म्हणून हा जप करण्यात आला आहे. वेळेप्रमाणे त्याकाळी राजा- महाराजांचा जमाना होता, त्यांचीच चलती होती. परंतू अंहकारी आणि घमेंडखोर व्यक्ती आयुष्यात कधीच पुढे जात नाही. असे असतांनाही एक राजा मात्र अहंकारी होता, घमेंडी होता.
आपल्याकडे आहे ते कुणाकडेच नाही, असे त्याला नेहमी वाटत असे. परंतू भगवंताला काय प्यारं आहे, हे तो विसरला होता. त्याला त्याची मुळीच जाणीव नव्हती, असेही त्यांनी शेवटी सांगितले. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन करुन सर्वांचे आभार मानले.